पंढरपूर : रत्नागिरीतील 31 वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 31 वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांच्यावर आज पहाटेपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 31 वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांच्यावर आज पहाटेपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती चांगली असून, दुपारनंतर या सर्वांना घरी सोडले जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे यांनी दिली.

संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील वारकरी कार्तिकी वारीसाठी आले होते. धुंडा महाराज मठाशेजारी इनामदार वाडा येथे ते मुक्कामास होते. उपवासाची भगर खाल्याने पहाटे उलट्या-जुलाब सुरू  झाल्याने त्यापैकी दोन मुले आणि 29 जणांना पालिकेच्या संसर्गजन्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उपजिल्हा रुग्णलायच्या डॉ. जयश्री ढवळे व नगरपरिषदचे मुख्य वैधकीय अधिकारी डॉ. बी. के. धोत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांनी दवाखान्यात जाऊन संबंधितांची विचारपूस केली. सर्वांची प्रकृती उत्तम असून, दुपारी त्यांना घरी पाठविले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31 people cause poisoning in pandharpur