Crime News : जत पुन्हा हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; १५ दिवसात आठवी घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : जत पुन्हा हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; १५ दिवसात आठवी घटना

Sangali Crime News : सांगलीच्या जतमध्ये खुनांचे सत्र थांबताना दिसत नाहीये . जिल्ह्यातील आता जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या यल्लमा रोडजवळ एका तरुणाचा गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कागायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान परिसरात मागील १५ दिवसांतील ही आठवी घटना आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत बिरा मदने (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून घरापासून काही अंतरावर शेतात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आाला आहे. शशिकांत मदने हा ट्रॅक्टर चालक असून, या खुनामागील कारण अद्याप समोर आले नाही.

हेही वाचा- शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

गेल्या काही दिवसांपासून जत शहरात सतत हत्येच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कोसारी येथे दोघा जणांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ जत शहरामध्ये भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनाची घटना घडली होती. यानंतर आता आणखी एका तरुणाची निर्घृण हत्येची घटना घडल्याने जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :SangliCrime News