सातारा तालुक्‍यातील रस्त्यांसाठी ३.३६ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सातारा - सातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात तीन कोटी ३६ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून ही  कामे मंजूर झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. 

बेल्हे शिक्रापूर, जेजुरी, लोणंद ते सातारा या राज्यमार्ग ११७ मधील पोवई नाका ते पोलिस कवायत मैदान या दरम्यानची सुधारणा करण्यासाठी ६५ लाख रुपयांची, सातारा- कोरेगाव ते पंढरपूर, मोहोळ राज्यमार्ग १४१ या रस्त्यावरील सातारा पंचायत समिती ते जिल्हा परिषद चौक या दरम्यानची सुधारणा करण्यासाठी एक कोटी २० लाख रुपये निधीची, सातारा तालुक्‍यातील राज्यमार्ग १४० ते सोनगाव- कुमठे, आसनगाव रस्ता प्रजिमा ३१ मधील शेरेवाडी ते कुमठे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५१ लाख रुपये, तसेच सातारा, गजवडी, ठोसेघर ते चाळकेवाडी या प्रजिमा २९ रस्त्यामधील बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या रस्त्याच्या सुधारणेसाठी एक कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. 

Web Title: 3.36 crore for roads in Satara taluka