सातारा - आनेवाडी टोलनाक्यावर 35 पोती गुटखा जप्त        

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कवठे (सातारा) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर पुण्याच्या दिशेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दिनेश कुमार या व्यक्तीला भुईंज पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा 35 पोती गुटखा जप्त केला.

याबाबतची माहिती अशी की, मंगळवारी (ता. 10) सकाळी नऊच्या सुमारास भुईंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांची नियमित तपासणी करीत असाताना त्यांना एका गाडीचा संशय आला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे कसून चौकशी केली असता, गाडीत गुटख्याची 35 पोती आढळून आली. त्याची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलीसांनी दिनेश कुमार नावाच्या व्यक्तिला त्याच्याकडे असलेल्या वाहनासह (क्रमांक एमएच 12  एनजे 5160) ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.

Web Title: 35 bags gutka seized at anewadi toll naka satara