esakal | कवठेमहांकाळात 35 लाखांचा गुटखा जप्त; चौघांविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

कवठेमहांकाळात 35 लाखांचा गुटखा जप्त; चौघांविरोधात गुन्हा दाखल

कवठेमहांकाळात 35 लाखांचा गुटखा जप्त; चौघांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कवठेमहांकाळ (सांगली) : शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे रात्री अकराच्या सुमारास अवैध गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी (16) ही कारवाई केली. अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मिळताच पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, पोलिस हवालदार राजू मानवर, संतोष बेंबडे, पोलिस नाईक दादासाहेब ठोंबरे, अविनाश शिंदे, विनोद चव्हाण यांच्या पथकाने शिरढोण येथे वाहनांची तपासणी सुरू केली.

यावेळी मिरजहून शिरढोणकडे वाहन येत असल्याचे दिसले. ते थांबवून तपासले असता त्यातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची 100 हून अधिक पोती आढळली. त्यानंतर वाहनचालक आसिर मुबारक गोलंदाज (रा. सांगली वेस, मिरज) व दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत 26 लाखांचा गुटखा, सुगंधित तंबाखू व 9 लाखांचे वाहन असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. महिनाभरात कवठेमहांकाळ पोलिसांची तिसरी मोठी कारवाई आहे.