जिल्ह्यात ३६ नवीन मतदान केंद्रे

ओंकार धर्माधिकारी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मतदारसंख्या वाढल्यामुळे, तसेच काही ठिकाणी इमारत खराब झाल्यामुळे जिल्ह्यात नव्याने ३६ मतदान केंद्रे बनवण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपासून ही मतदान केंद्रे कार्यान्वित होतील. वाढलेल्या मतदान केंद्रांची सर्वाधिक संख्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात आहे. 

पाच वर्षांत मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मतदानादिवशी केंद्रांवर मतदारांची गर्दी होते. या गर्दीमुळे तेथील सुरक्षेचा प्रश्‍नही निर्माण होतो. बहुतांशी मतदानकेंद्रे शाळा किंवा अन्य सरकारी कार्यालयांत असतात. यातील काही इमारतींची दुरवस्था झाली आहे. या सर्व कारणांमुळे जिल्हा निवडणूक विभागाने नवीन ३६ मतदान केंद्रांचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला पाठविला होता. याला मान्यता मिळाली आहे.

मतदारांची संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्रांची संख्याही वाढवावी लागली. या केंद्रांना मान्यता मिळाली असून, त्याप्रमाणेच मतदारयाद्यांचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळे मतदानाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल. 
- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

याद्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मतदारयाद्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. अद्ययावत मतदारयाद्या या देखील नवीन मतदान केंद्रांनुसारच बनवण्यात येतील. नवीन मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीपासून मतदान प्रक्रिया राबवली जाईल. जिल्ह्यामध्ये ३३२१ मतदान केंद्रे आहेत.

Web Title: 36 New Voting Center