सोलापुरात जूनमध्येच 386 मिलिमीटर पाऊस 

तात्या लांडगे
शनिवार, 9 जून 2018

सोलापूर : जिल्ह्यात 1 ते 8 जून या कालावधीत सुमारे 386.21 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 110.92 मिलिमीटरची वाढ झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आज सांगण्यात आले. 

सोलापूर : जिल्ह्यात 1 ते 8 जून या कालावधीत सुमारे 386.21 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 110.92 मिलिमीटरची वाढ झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आज सांगण्यात आले. 
शहर, जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, पंढरपूर या तालुक्‍यांमध्ये मागील आठ दिवसांपासून सरासरी 50 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्‍यांमध्येही सरासरी 30 मिलिमीटर तर माळशिरस, माढा या ठिकाणी 20 मिलिमीटर पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे बळिराजा सुखावला असून जलयुक्‍त शिवारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. 

आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा 
राज्यातील विविध भागांत हवामान खात्यातर्फे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात उद्या (शनिवार) आणि परवा (रविवार) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

आकडे बोलतात... 
अपेक्षित पाऊस 
1 जून ते 30 सप्टेंबर 
5,377.10 मिलिमीटर 
यंदा झालेला पाऊस 
1 ते 8 जून 
386.21 मिलिमीटर 
गतवर्षी 1 ते 8 जूनपर्यंतचा पाऊस 
275.29 मिलिमीटर

Web Title: 386 mm rain in solapur in june only