सोलापूर बाजार समितीत 39 कोटींचा गैरव्यवहार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2011 ते 2016 या कालावधीत 39 कोटी सहा लाख 39 हजार 193 रुपयांचा गैरव्यवहार झाला असून विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी जेलरोड पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. 

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2011 ते 2016 या कालावधीत 39 कोटी सहा लाख 39 हजार 193 रुपयांचा गैरव्यवहार झाला असून विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी जेलरोड पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. 

बाजार समितीत 1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्‍टोबर 2011 या कालावधीत 14 समिती सदस्य, एक सचिव आणि 18 ऑक्‍टोबर 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत 20 समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बाजार समितीच्या रकमा मुदत ठेव म्हणून ठेवताना फायदा होईल अशाप्रकारे गुंतवणूक केल्या नाहीत, बाजार समितीमधील बांधकाम मुदतीत न करणाऱ्या ठेकेदाराला दंड केला नाही, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी बाजार समितीत शिपाई, लिपिक व अन्य कर्मचारी नियुक्त करता येत नसतानाही नियुक्ती केली आहे. यासह14 मुद्दे विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी तक्रार अर्जात मांडले आहेत. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तक्रारी अर्ज देण्यात आला आहे. 2011 ते 2016 या कालावधीतील समिती सदस्य, सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- अपर्णा गिते, पोलिस उपायुक्त 

Web Title: 39 crore fraud in Solapur Bazar committee