पथसंस्थेसह चार दुकाने फोडली, 1 लाख 60 हजार रुपये लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सातारा : येथील बॉम्बे रेस्टारंट परिसरात पुणे - बंगळूरू महामार्गावरील वास्तू प्लाझा या अपार्टमेंटमधील एका पतसंस्थेसह चार दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.

सातारा : येथील बॉम्बे रेस्टारंट परिसरात पुणे - बंगळूरू महामार्गावरील वास्तू प्लाझा या अपार्टमेंटमधील एका पतसंस्थेसह चार दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.

वास्तू प्लाझा या इमारतीमध्ये राज्य कृषी कर्मचाऱ्यांची पतसंस्था, ई-कॉम
एक्‍सप्रेस कुरीअर, बालाजी ग्रेनाईट व भैरवनाथ ट्रान्सपोर्ट ही या संस्थांची कार्यालये आहेत. काल रात्री ही चारही कार्यालये चोरट्यांनी फोडली. आज सकाळी ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या वेळी संबंधितांनी पाहणी केल्यावर पतसंस्थेतून सुमारे 80 तर, कुरीअरच्या कार्यालयातून सुमारे 83 हजार रुपये रोख रक्कम अशी सुमारे एक लाख 63 हजार रुपये रोख
रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले.

याबाबत दुकान मालकांनी माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्माकर घनवट व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा मागकाढण्यासाठी श्‍वान व ठसे तज्ञांचे पथक बोलावण्यात आले होते. चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया शहर पोलिस ठाण्यात सुरू आहे.

Web Title: 4 shops patsanstha looted 1 lakh 60 thousand