शिरोळच्या दत्त साखर कारखाना निवडणुकीसाठी 41 जण रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

शिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडून द्यावयाच्या 21 जागांसाठी 41 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने आजची सभा मतमोजणीपर्यंत (ता. 28) तहकूब करीत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी केली.

श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर साधारणसभा कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी बोलविली होती. 

शिंगटे म्हणाले, ""उत्पादक गटातील 16 जागांसाठी माघारीनंतर 33 उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, सर्वसाधारण महिलेच्या दोन जागांसाठी तीन, तसेच सामान्य बिगर उत्पादक व संस्था गट दोन जागांसाठी तीन उमेदवारांचे अर्ज रिंगणात राहिल्याने निवडून द्यावयाच्या 21 जागांसाठी 41 उमेदवारांचे अर्ज असल्याने 27 जुलैला सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत 62 केंद्रांवर मतदान घेण्यात येईल. रविवारी 28 जुलैला मतमोजणी सुरवात करण्यात येईल. मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत ही सभा तहकूब करण्यात येत आहे.'' 

सभेस सहायक निवडणूक अधिकारी गजानन गुरव, एस. एल. माळी, पी. जी. पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, अध्यक्ष गणपतराव पाटील, उपाध्यक्ष सिंदगोंडा पाटील, अनिलकुमार यादव आदी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 candidates for Shirol Dutt Sugar Factory election