राष्ट्रवादीच्या 41 कार्यकर्त्यांचीन्यायालयीन कोठडी रवानगी: दुहेरी हत्याकांड

Crime.jpg
Crime.jpg

नगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य मित्र पक्षांच्या 41 संशयीत आरोपींना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली.

तोडफोडीच्या गुन्ह्यातील 41 आरोपी 21 तारखेला सकाळी भिंगार पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यांना चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. त्यात नगरसेवक आरिफ शेख, कुमार वाकळे, संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक समद खान आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

सात मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कलम 308 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) लावण्यात आले होते. तथापि, अलिकडेच तपासाअंती गुन्ह्यातील हे कलम वगळण्यात आले. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या वेळी जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. तसेच जगताप यांना पोलिसांसमोरून उचलून नेले. त्याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांच्यासह 300 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com