आदिक यांच्या मोटारीतून साडेचार लाख रुपये जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मोटारीतून चार लाख 58 हजार रुपये जप्त करण्यात आले. नाशिकजवळ पुणे महामार्गावर शिंदे-पळसे गावाजवळ पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली.

आदिक काल (शुक्रवारी) मुंबईहून मोटारीने (एमएच 17 सीडी 3149) श्रीरामपूरकडे येत होते. शिंदे-पळसे गावाजवळील टोल नाक्‍यावर भरारी पथकातील हरी सूर्यवंशी, संतोष पिंगळे आणि पोलिस शिपाई श्‍यामराव शिंदे व सखाराम शेळके यांच्या पथकाने रात्री अकराच्या सुमारास आदिक यांची मोटार थांबविली. तपासणी केली असता त्यात चार लाख 58 हजार रुपयांची रोकड सापडली. भरारी पथकाचे प्रमुख मच्छिंद्र कांगणे यांनी ही रक्कम जप्त करून रात्री दीड वाजता नाशिक कोषागार कार्यालयात जमा केली.

याबाबत आदिक यांनी सांगितले, ""तपासणी सुरू असल्याने आम्ही तेथे थांबलो. भरारी पथकाला सर्व तपशील दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता करून तेथून निघून आलो.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4.50 lakh rupees seized from Adik's car