चंदगडमधील फाटकवाडी प्रकल्प क्षेत्रातील 450 जण सुरक्षित स्थळी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

चंदगड - फाटकवाडी (घटप्रभा) प्रकल्पाच्या सांडव्याच्या खालील भिंत खचल्याच्या कारणाने खबरदारी म्हणून प्रशासनाने संभाव्य पूररेषेतील विविध कुटुंबांतील 450 जणांचे स्थलांतर केले. त्यांची येथील रवळनाथ मंदिराचे सभागृह, र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या सभागृहात सोय केली आहे. 

तहसील आणि पाटबंधारे खात्याच्या उपअभियंत्यांच्या नावे काल प्रकल्प क्षेत्रातील वीस गावांची नावे स्पष्ट करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचा आदेश काढला होता. बहुतांश भागांत वीजपुरवठा सुरळीत नसल्याने मोबाईल व इतर संपर्काची साधने बंद असल्याने स्थानिक भागातील अनेकांपर्यंत ही माहिती पोहोचली नव्हती.

दरम्यान, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी मात्र अशी कोणतीही वाईट स्थिती नसून, त्या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा विचार करून खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आज या खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना घेऊन पाहणी केली. दरम्यान, नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाच्या वतीने काल रात्रीच प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या विविध गावातील 450 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले. शहरातील हिंदु, मुस्लीम सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांची जेवणाची सोय केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 450 people safe place in Phatakwadi project area of Chandgad