मिरजेत 45 हजारांचा गांजा जप्त ; दोघांना अटक 

 45,000 marijuana seized in Miraj; Both arrested
45,000 marijuana seized in Miraj; Both arrested

मिरज (जि. सांगली) : शहरातील टाकळी रोड येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या पुणे येथील एका तरुणासह दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार किलो 140 ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि दोन मोबाईल असे साहित्य जप्त केले आहे.

अजित मधुकर सरगर (वय 23, मिरज अर्बन बॅंक कॉलनी, सुभाषनगर) आणि सुमीत संजय सरगर (वय 26, रामनगर, येरवडा, पुणे) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही चुलत भाऊ आहेत. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की काही महिन्यांपासून सुभाषनगर परिसरात गांजाची तस्करी वाढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोघे तरुण अग्रभागी असल्याचेही पोलिसांना समजले. एकजण मालगाव येथे काही वर्षांपूर्वी कार्यरत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. दुसरा पुणे येथील त्याचा चुलत भाऊ असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. दोघेही त्यांच्याकडील चार किलो 140 किलो ग्रॅम वजनाचा गांज्या विकण्यासाठी टाकळी रस्त्यावर आले असतानाच पोलिसांनी छापा टाकून त्यांना पकडले.

त्यांच्याकडे चार किलो 140 ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. हा गांजा, मोटारसायकल आणि दोन मोबाईल असे 1 लाख 10 हजार 409 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. अटक झालेल्यांपैकी अजित मधुकर सरगर (सुभाषनगर) हा नुकताच पुणे येथील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडला.

दुसरा सुजित त्याचा चुलत भाऊ आहे. तो पुण्यातच राहतो. दोघांनीही गांजा पुण्यातून आणल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले. दोघांकडून गांजा कोणाला विकला जाणार होता. त्यांनी गांजा नेमका कुठून आणला याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com