नव्या वर्षात असे आहेत लग्नाचे मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

संसारात अनंत कटकटी असल्या तरी लग्न मुहूर्तांवरील लोकांचा विश्‍वास कायम आहे. त्यामुळे मुहूर्त पाहण्यासाठी अनेकजण आपल्या विश्‍वासातील भटजी, ज्योतिष, स्वामींचा सल्ला घेतात. दिवाळीनंतर पाच दिवस तुलसी विवाह संपले की लग्न सराईचा काळ सुरू होतो.

सांगली - तुलसी विवाहानंतर लग्न समारंभाचे बार उडू लागलेत. मावळत्या वर्षात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात 11 मुहूर्त आहेत. तर नूतन वर्षात लग्नाचे 49 मुहूर्त आहेत. तर चातुर्मासात अडचणीच्या काळात देखील 40 मुहूर्त आहेत. नूतन वर्षात 49 मुहूर्त असले तरी त्यापैकी केवळ सात मुहूर्तच रविवारी आहेत. त्यामुळे लग्न समारंभास जाणाऱ्यांना रजा काढण्यासाठी सावधान रहावे लागेल. 

संसारात अनंत कटकटी असल्या तरी लग्न मुहूर्तांवरील लोकांचा विश्‍वास कायम आहे. त्यामुळे मुहूर्त पाहण्यासाठी अनेकजण आपल्या विश्‍वासातील भटजी, ज्योतिष, स्वामींचा सल्ला घेतात. दिवाळीनंतर पाच दिवस तुलसी विवाह संपले की लग्न सराईचा काळ सुरू होतो.

असे आहेत मुहूर्त 

मावळत्या वर्षात नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये एकूण 11 मुहूर्त आहेत. त्यानंतर जानेवारी महिन्यात 5, फेबुवारी 8, मार्च 6, एप्रिल 4, मे 10 आणि जूनमध्ये सहा मुहूर्त आहेत. जुलै ते नोव्हेंबर महिन्यात चातुर्मास असल्यामुळे लग्नाचे मुहूर्त नाहीत. नोव्हेंबरमध्ये महिना अखेरीस दोन मुहूर्त आहेत. तर डिसेंबर महिन्यात 8 मुहूर्त आहेत. नूतन वर्षात लग्नाचे 49 मुहूर्त आहेत. त्यापैकी 7 मुहूर्तच रविवारी आहेत. त्यामुळे नोकरदारांना रजा संकट असेल. 

अडचणीचे 40 मुहूर्त 
ग्रामीण भागातील रूढी-परंपरामुळे अनेकांना मुहूर्त नसताना अडचणीचे मुहूर्त शोधावे लागतात. चातुर्मासामध्ये जुलै ते नोव्हेंबरमध्ये असे 40 मुहूर्त उपलब्ध आहेत. या मुहूर्तांना गौण काळातील मुहूर्त असे देखील म्हटले जाते. खरे तर आजकाल वधू टंचाई विचारात घेता मुलगी सापडणे हाच एक मुहूर्त मानावे लागेल. 

हेही पाहा...

आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणारे असे आहे कोल्हापुरातील सुंदर घर 

काँग्रेस आमदाराच्या पत्नी, भावाचे मतदान भाजप ताराराणी आघाडीलाच 

तो मारतो बैठका ; पाठीवर ७० किलोचे पोते घेऊन ( व्हिडीओ ) 

एकरकमी एफआरपीसह 350 दराची या संघटनांची मागणी

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 49 Weeding Time In New Year

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: