भिमा साखर कारखान्याच्या निवृत कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस

राजकुमार शहा 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असुन चर्चेच्या झालेल्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. दरम्यान आज उपोषण स्थळाला भिमाचे माजी अध्यक्ष सुधाकर परीचारक प्रादेशिक सहसंचालक शशीकांत घोरपडे आदिंनी भेट दिली. दरम्यान उपोषणातील दोन कामगारांना अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना मोहोळच्या ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोहन माने व महादेव वाघ अशी दाखल केलेल्या कामगारांची नावे आहेत. 

भिमा कारखान्यातील अनेक कामगार सेवा निवृत झाले आहेत. सेवानिवृती नंतर त्यांची कारखान्याकडे असलेली रक्कम  ठराविक कालावधीत कामगारांना देणे क्रमप्राप्त आहे. यापूर्वी कामगारांना पंचेचाळीस टक्के रक्कम कारखान्याने अदा केली आहे. उर्वरित पंच्चावन्न टक्के रक्कम जून अखेर देण्याचे कारखाना प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र रक्कम अद्यापही दिली नाही. दरम्यान मंगळवार व बुधवारी अशा दोन वेळा  कारखान्याचे उपाध्यक्ष सतिश जगताप यांनी उपोषण स्थळाला भेट दिली व कामगारा बरोबर चर्चा केली मात्र कामगार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने चर्चा निष्फळ ठरली. 

दरम्यान आज उपोषण स्थळाला सकाळी अकरा वाजता भिमाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक प्रादेशीक सह संचालक शशीकांत घोरपडे, कार्यकारी संचालक महेश सगरे, लेखापरीक्षक के ए शिंदे आदींसह अन्य राजकीय नेत्यानी भेट दिली व चर्चा केली. यावेळी सुधाकर परिचारक यांनी घोरपडे यांना या समस्येतुन वरिष्ठ पातळीवरून मार्ग काढण्याविषयी सांगितले. तर घोरपडे यांनी हा विषय कामगार आयुक्तांच्या कानावर घालून त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले कार्यकारी संचालक सगरे यांनाही घोरपडे यांनी काही सूचना दिल्या. 

दरम्यान उपोषणस्थळाला मोहोळचे तहसीलदार किशोर बडवे यांनी वेळोवेळी भेटी दिल्या. तर कारखाना प्रशासन व कामगार प्रतिनीधी यांची संयुक्त बैठक आयोजिली होती. तरीही मार्ग निघाला नाही या समस्येबाबत मी जिल्हाधिकारी कारखान्याचे अध्यक्ष साखर आयुक्त कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी उपोषणाला भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.  
 
Web Title: 4th day of agitation of former employeesb of bhima sugar factory