जामखेड हत्याकांडप्रकरणी पाच जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

जामखेड : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवक कार्यकर्ते राकेश राळेभात यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी जामखेडचे माजी सरपंच कैलास विलास माने (वय 46) व त्यांचे धाकटे बंधू प्रकाश विलास माने (वय 44, दोघे रा. तपनेश्वर रोड, जामखेड) यांच्यासह पाच आरोपींना जामखेड पोलिसांनी अटक केली. आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

माने बंधूंबरोबरच आरोपीला आश्रय दिल्याच्या गुन्ह्यात दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 50, रा. तेलंगशी, ता. जामखेड), सचिन गोरख जाधव (वय 34, रा. भांडेवाडी, कर्जत), बापू रामचंद्र काळे (वय 50, रा. नेर्ले, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. 
या संदर्भात अधिक माहिती अशी, शनिवारी (ता. 28) योगेश व राकेश राळेभात यांची सहाजणांनी गोळीबार करून हत्या केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल आहे.

या गुन्ह्यात गोविंद गायकवाड हे एक नाव निष्पन्न झाल्याने गोविंदचे वास्तव्य असलेल्या उल्हास माने यांच्यासह तालमीच्या दिशेने पोलिसांच्या तपासाची सूत्रे हलली. घटना घडल्यानंतर तालमीतील माने याच्यासह सर्वांनीच पळ काढल्याने गुन्ह्याच्या तपासाची दिशा पोलिसांनी निश्‍चित करून माने यांचे बंधू जामखेडचे माजी सरपंच कैलास माने व प्रकाश माने या दोघांना सलग दोन दिवस चौकशीसाठी बोलावले. अखेर मोबाईल फोनच्या संपर्काहून या दोघांना हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. तसेच पसार असलेल्या गोविंद गायकवाड, उल्हास माने व अन्य आरोपींना आश्रय दिला, म्हणून गोविंदचे वडील दत्ता गायकवाड, भांडेवाडी-कर्जत येथील रहिवासी उल्हासचा मेहुणा गोरख जाधव व उल्हासला जेवण देऊन आश्रय देणाऱ्या नेर्ले (ता. करमाळा) येथील बापू काळे याला पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींना मंगळवारी (ता. 1) न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची (ता. 7 पर्यंत) पोलिस कोठडी देण्यात आली.

Web Title: 5 arrested for jamkhed 2 murders