अबबऽऽऽ शेळीने दिली चक्क एवढी पिल्लं! (व्हिडिओ) 

अक्षय गुंड 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- माढा तालुक्‍यातील लोंढेवाडीत शेळीला पाच पिल्लं 
- पाचही पिल्लं ठणठणीत 
- दोन बोकड, तीन पाटींचा समावेश 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : निसर्गाची लीला काही औरच असते. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळीविषयी आपल्या ऐकण्यात आले असेल. परंतु माढा तालुक्‍यातील लोंढेवाडीत निसर्गाचा चमत्कार झाला असून येथे चक्क शेळीने चक्क पाच पिल्लांना जन्म दिला आहे. 

हेही वाचा सोलापूर जिल्ह्यातील छावणी चालकांना आश्वासन  

निसर्गात कधी काय घडेल याचा नेम नसतो, याचाच प्रत्यय लोंढेवाडीत आला आहे. लोंढेवाडी येथील शेतकरी शंकरराव साहेबराव मुळूक यांचा शेतीचा व्यवसाय आहे. त्याला जोडधंदा म्हणून ते शेळीपालन करतात. सोमवारी दुपारी त्यांच्या एका शेळीने प्रथमच एकाचवेळी तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे. यात दोन नर (बोकड) व तीन मादी (पाट) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शेळी व जन्मलेली पाचही पिल्ले सदृढ असून प्रकृती ठणठणीत आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच शेतकरी शेळी व पिल्लांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. आतापर्यंत तीन किंवा चार पिल्लं शेळीला होतात. हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु त्यात देखील सर्वच जगतात असे नाही. मात्र, या ठिकाणी शेळीची पाचही पिल्लं जिवंत आहेत. त्यामुळे निसर्गाचा चमत्कार झाला असून या शेतकऱ्याचा उद्धार झाला असल्याचे बोलले जात आहे. 

लाखात कुठेतरी अशी एखादी घटना घडते. त्यातही सर्व पिल्ले जिवंत राहत नाहीत. परंतु येथील सर्व पिल्ले सदृढ व ठणठणीत आहेत. 
- डॉ. चंद्रकांत व्होनमाने, 
पशुधन पर्यवेक्षक, माढा 


शेळीला पाच पिल्ले झाल्याने आश्‍चर्य वाटत आहे. आतापर्यंत मी असे कधीच पाहिले नव्हते. विशेष म्हणजे सध्या शेळी व पिल्लांना काहीही झाले नाही याचे नवल वाटते. 
- शंकर मुळूक, 
शेळीपालक, लोंढेवाडी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 5 chicks Goat gave