विश्रामगृह बांधकामासाठी पाच कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजुर : आमदार बाबर

नागेश गायकवाड     
मंगळवार, 10 जुलै 2018

आटपाडी : येथे शासकीय धान्य गोदाम बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि महत्वाच्या व्यक्तीसाठी विश्रामगृह बांधकामासाठी पाच कोटी 77 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली. ते म्हणाले , 'विविध विकास कामे आणि बांधकामासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. यातील काही कामांना मंजूरी मिळाली. शासकीय धान्य गोदाम उभारणीसाठी 3 कोटी 90 लाख रुपये निधी बांधकाम विभागाने मंजूर केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय अत्यंत अपुरे होते. या कार्यालयाची प्रशस्त आणि सुसज्ज इमारत बांधकामासाठी एक कोटी 17 लाख रुपये निधी सरकारने मंजूर केले आहेत. तसेच तालुक्यात अनेक महत्त्वाच्या आणि नामांकित व्यक्ती विविध कामासाठी भेट देण्यासाठी येत असतात. त्यांच्या निवासाची गैरसोय होत होती. या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासासाठी 69 लाख रुपये विश्रामगृह बांधकामासाठी मंजूर झाले आहेत. या तिन कामासाठी पाच कोटी 77 लाख निधी मंजूर झाला आहे. अन्य कामांनाही लवकरच मंजूरी मिळेल.

Web Title: 5 crore 77 lakh sanctioned for construction of rest house: MLA Babar