'डीएनए' चाचणीत आढळले पाच भ्रूण मुलींचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

सांगली - म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भ्रूण अवशेषांची "डीएनए' चाचणी केल्यानंतर तीन भ्रूण मुलांचे आणि पाच भ्रूण मुलींचे असल्याचा अहवाल मिळाला आहे. अहवाल महत्त्वाचा पुरावा असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे म्हणाले, 'म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात डीएनए चाचणी तपासातील महत्त्वाचा भाग होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खिद्रापुरे याच्या दवाखान्यापासून काही अंतरावर खोदकाम करून भ्रूण अवशेष ताब्यात घेतले. त्यामध्ये दिसू शकतील असे आठ भ्रूण होते. त्यांची "डीएनए' चाचणी केल्यानंतर तीन भ्रूण मुलांचे आणि तीन भ्रूण मुलींचे असल्याचे स्पष्ट झाले. दोन भ्रूण अवशेषांमध्ये तपासणीयोग्य अंश दिसून आला नाही. त्यामुळे त्याचा निष्कर्ष आला नाही. टॉवेलमध्ये गुंडाळून टाकलेले 19 भ्रूणही डीएनए चाचणीसाठी पाठवले होते. अवशेष कुजलेले होते. त्यापैकी सहा अवशेष तपासणीसाठी योग्य होते.

सहामध्ये दोन भ्रूण स्त्रीचे मिळाले तर चार अवशेषांचा निष्कर्ष आला नाही. पोलिस तपासात एकूण आठ भ्रूणांचा डीएनए अहवाल प्राप्त झाला. त्यांचे पालक निश्‍चित करण्यासाठी काही दाम्पत्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने घेतले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी पालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याबाबत विधी तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला जाईल. या प्रकरणात तपासापासून गुन्ह्याचा निष्कर्ष येईपर्यंत विशेष सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर (पुणे) यांची नियुक्ती केली आहे.''

Web Title: 5 embryo girl found in dna test girl