सागरच्या मुलीच्या नावे पाच लाखांची ठेव - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

कोल्हापूर - राजर्षी शाहूंची भूमिका साकारताना रंगमंचावरच एक्‍झिट घेतलेला अभिनेता सागर चौगुलेच्या मुलीच्या नावे पाच लाखांची ठेव आणि त्यांच्या पत्नी वनिता यांना शासकीय नोकरीत रुजू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जाहीर केले. तसेच जिल्ह्यातील कलाकारांची यादी तयार करून त्यांना विविध विमा योजनांतर्गत संरक्षण देण्यात येईल, असेही सांगितले. 

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘अग्निदिव्य’ नाटक सादर करताना अभिनेता सागर चौगुलेचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी त्याला उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी पालकमंत्री पाटील यांनी राजारामपुरी येथील सागरच्या घरी जाऊन त्याची आई, पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

ते म्हणाले, ‘‘सागरच्या जाण्याने कुटुंबावर जो आघात झाला आहे त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. सागर यांच्या नारायणी या दहा महिन्याच्या मुलीच्या नावे पाच लाखांची रक्कम ठेव ठेवण्यासाठी कोल्हापुरातील रंगकर्मी व विविध संस्थांच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. हा संदर्भ घेत पालकमंत्र्यांनी उपस्थित कलावंतांना तुमच्याकडून शक्‍य तितकी अधिकाधिक रक्कम गोळा करा. शासनाच्या वतीने देखील भरीव निधी दिला जाईल, तसेच सागरची पत्नी वनिता चौगुले, यांना सरकारी नोकरी देण्यात येईल,’’ असे सांगितले. या वेळी निर्माते पद्माकर कापसे, दिग्दर्शन सुनील माने, प्रकाश पाटील, पंडित कंदले आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनीही सागरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी रंगकर्मींनी खासदार महाडिक यांना मदतनिधी लवकरात लवकर सागरच्या कुटुंबीयांना मिळावा, यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.

Web Title: 5 lakh deposit to sagar daughter by chandrakant patil