अकलूज येथील पाच जणांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

माळशिस/अकलूज - रणजित देवकर खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप, तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निकाल माळशिरस येथील जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आज दिला. हे प्रकरण पूर्ववैमनस्यातून घडले होते.

दशरथ ऊर्फ आबा विठोबा माने (वय 30, रा. मानेवस्ती बागेचीवाडी), सचिन गजानन जाधव (वय 24), नितीन हरी जगदाळे (वय 28), बालाजी अप्पा कोळी (वय 25, तिघेही रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे), अतुल ऊर्फ पिंटू नंदकुमार मोहिते (वय 36, राऊतनगर अकलूज) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत, तर श्रावण ऊर्फ बापू बाळासाहेब भोरकडे (रा. नवचारी बागेचीवाडी), सचिन गजानन महाजन (रा. सराटी, ता. इंदापूर), अतुल ऊर्फ भैया गोरख इंगळे (रा. आसबेवस्ती, संग्रामनगर), गजानन किसन जाधव (रा. कळंब, ता. इंदापूर) यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. 17 सप्टेंबर 2015 रोजी रणजित देवकर आपल्या मित्रासोबत नवचारी येथील हॉटेल उत्सव समोरून जाणाऱ्या रस्त्यावर थांबला होता. या वेळी दोन मोटारसायकलींवरून आलेल्या आठ जणांनी तलवार व कोयत्याने त्याच्यावर वार केले होते.

Web Title: 5 person Life imprisonment in murder case crime