सोलापूरजवळ मालगाडीचे पाच डबे घसरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

या दुर्घटनेमुळे 12 रेल्वे गाड्या होटगी-गुंटकाल आणि वाडी-लातूर-मनमाड या मार्गांनी वळविण्यात आल्या आहेत. 

सोलापूर - सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल वाडीहुन होटगीकडे घेउन येणाऱ्या मालगाडीच्या इंजिनासह पाच डबे रविवारी मध्यरात्री रुळावरुन घसरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यामुळे ही दुर्घटना दुधनी रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे दक्षिणेकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. वेळापत्रक पुर्वपदावर येण्यासाठी किमान दहा ते बारा तासांचा वेळ लागेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दुर्घटनेमुळे 12 रेल्वे गाड्या होटगी-गुंटकाल आणि वाडी-लातूर-मनमाड या मार्गांनी वळविण्यात आल्या आहेत. रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक राजेंद्र शर्मा यांनी सांगितले.

Web Title: 5 wagons of goods train derail near Dudhani railway station