रामदेवबाबांच्या शिबीरासाठी सोलापूरातून 50 युवक हरिद्वारला रवाना

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 29 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : हरिद्वार येथे 30 मे पासून स्वामी रामदेवबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या युवा भारत विद्यार्थी संस्कार शिबीरासाठी जिल्ह्यातून 50 युवकांना सोबत घेऊन ज्ञानेश्वर शिंदे (प्रभारी युवा भारत), मोहन कुंभार (सोलापूर जिल्हा युवा प्रभारी) यांच्या सह एक तुकडी रेल्वेने हरिद्वारला रवाना झाली.

योगगुरू रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली हरिद्वार येथे 30 मे ते 3 जून या कालावधीत निःशुल्क युवा भारत विद्यार्थी संस्कार शिबीर होणार आहे. या शिबिरातून युवकांना पतंजलीच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधीची माहीती दिली जाणार आहे. याच बरोबर योगाचीही प्रात्यक्षिकासह सखोल माहीती देण्यात येण्यात आहे . 
 
Web Title: 50 boys going to haridwar from solapur for ramdevbaba camp