खासदार निधीतून धैर्यशील माने यांची ५० लाखांची मदत 

50 lakhs for dhairyashil mane from MP fund
50 lakhs for dhairyashil mane from MP fund

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणाऱ्या सुविधेसाठी खासदार स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये खर्चाचे पत्र खासदार धैर्यशील माने यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे दिले आहे. या रकमेतून औषधे व अन्य यंत्रसामुग्री खरेदी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी खासदारांना पत्र पाठवून निधीची मागणी केली होती. 

या पन्नास लाख रकमेतून इस्लामपूर पालिका 30 लाख, तर आष्टा व शिराळा नगरपालिकेसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

याबाबत खासदार माने म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधांची आवश्यकता आहे. त्यासाठी स्थानिक विकास निधीतील पन्नास लाख रुपये खर्च करून तातडीने त्या सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. इस्लामपूर शहरातील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा मेहनत घेत आहे. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.  "

तत्पूर्वी खासदार माने यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा भाग म्हणून एक हजार मास्क पाठवले आहेत. त्यांनी हे मास्क वाळवा पंचायत समितीकडे सुपूर्द केले. इस्लामपूर येथे 21 मार्चला चार कोरोनाबधित रुग्ण आढळले. त्यानंतर लागोपाठ हा आकडा वाढतच गेला. सध्या ही संख्या 25 वर जाऊन पोचली आहे. या सर्वांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्लामपुरात हे रुग्ण आढळल्यानंतर वाळवा तालुक्यात अत्यंत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याची गरज होती. परंतु, आरोग्य विभागाला मर्यादा होत्या. या परिस्थितीत वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने यांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याला प्रतिसाद देत खासदारांनी एक हजार मास्क पंचायत समितीकडे पाठवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com