दूध संकलनात पाच हजार लिटरने घट

Milk
Milk

सांगली - जिल्ह्यातील ५२० गावांत पडलेला दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे संकट वाढते आहे. शेतीला जोडधंदा असलेला दूध  व्यवसायही त्यातून सुटलेला नाही. टंचाईच्या या स्थितीचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत. सध्या प्रतिदिन चार हजार ९०० लिटर दूध संकलनात घट झाली आहे. यापुढील काळात १० हजारांहून अधिक लिटर दूध संकलनात घटीची शक्‍यता आहे.

जिल्ह्याला दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळाच्या भीषण स्थितीला सामोरे जावे लागते. पण अशाही स्थितीत  संघाचे दूध संकलन टिकून होते. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने दूध उत्पादनात घट होण्यास सुरवात झाली आहे. परिणामी संघाच्या संकलनात घट झाली. जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत. जिल्ह्याचे सरासरी दूध उत्पादन दररोज १५ लाख ३८ हजार लिटर इतके आहे. जिल्ह्यात प्रतीदिनी सुमारे ४ हजार ९०० लिटरने दूध संकलनात घटले आहे. जानेवारी २०१८ मध्ये १६ लाख ५८ हजार ८२४ लिटर प्रतिदिन दूध संकलन होते. जानेवारी २०१९ मध्ये १५ लाख ३३ हजार १०६ लिटर दुधाचे संकलन होते. याची तुलना केली तर १ लाख २६ हजार ७१८ लिटरने घट असल्याचे दिसते आहे. पण यंदा दुष्काळाची दाहकता इतकी वाढली आहे.

दुष्काळी पट्टयातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगावात दुभत्या जनावरांना ओला चारा मिळणे मुश्‍कील झाले आहे. या भागात चारा आणि पाणी पुरेसे मिळत नाही. त्यामुळे या पट्टयातील  दूध उत्पादनात घट झाली आहे. पलूस, वाळवा, मिरज तालुक्‍यात दूध उत्पादनात घट झाली नसल्याचे शासकीय दूध संघाच्या सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com