52 कैदी रजा, पॅरोलवरून फरार

52 कैदी रजा, पॅरोलवरून फरार

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना संचित किंवा अभिवचन (पॅरोल) रजेवर जाऊन फरार झालेल्या कैद्यांबाबत जनतेला माहिती व्हावी आणि त्यांचा शोध लावता यावा, फरार होण्याच्या प्रमाणात घट व्हावी, यासाठी कारागृह प्रशासनाने अशा फरार कैद्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या काही वर्षांत असे 52 कैदी फरार झाले असून, नागरिकांनी सतर्क राहून त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सुमित ब्रिजबिहारी गिरी, बाबू हनुमंत उर्फ नरसय्या मद्रासी, विश्वनाथ जगन्नाथ यादव उर्फ मोठा काका, जितेंद्र तानाजी माने, मुजीब खलील इनामदार, नासीर खलील इनामदार, बाबू वीर महाराणा, अनिल शशिकांत आळवे, दादासाहेब बाळाराम जाधव, विनोद रामचंद्र धाकड, गौतमलाल भवनजी मीणा, गणेश सखाराम कांबळे, नितीन अनिल स्वर्गे, कडया उर्फ लक्ष्मण महादेव वैरागणे, आसईतंबी उर्फ लंगडा उर्फ सत्या नटराजन नाडर, बलबीरसिंग इंद्रसिंग महाल, अंबादास तुकाराम पवार, मंगलसिंग उर्फ मंगेश चतुरसिंग ओनावले, अमरसिंग कालुसिंग विश्वकर्मा, पाकियाराज नटराज नाडर, मनजितसिंग जोगिंदरसिंग सैनी, यशवंत पांडुरंग कीर, चैनसिंग पेपसिंग राठोड, रमेश चिमाजी शिंदे, पिंटू उर्फ मारुती दत्तात्रय हरिहर, सुजित उर्फ पप्पू भीमा कुऱ्हाडे, सुनीत भीमा कुऱ्हाडे, बबलू मुरलीधर साळवे, दिलीप श्रावण कमाने, सर्जेराव सीताराम पोळ, अनिल मारुती काळे, श्रीकांत बापूराव गायकवाड, भरतकुमार भवरलाल पंड्या, अब्दुल गफुर अब्दुल रहीम बिया फक्की, यल्लाप्पा दशरथ गायकवाड, मोहम्मद हुसेन मोहम्मद सिद्धीक हमीदाणी, संतोष सदाशिव वसेकर, प्रमोद भीमराव भोसले, जाफर पैगंबर पाटील, राहुल बाबूराव पवार, इस्माईल महंमद शेख, राजू गुरखान मुजावर, प्रमोद मधुकर नाक्ती, विकास हरी जाधव, प्रल्हाद अक्रूर चव्हाण, वसंत दिलीप लोंढे, सुरेश तिमप्पा शेट्टी, दिगंबर इरण्णा मजकुरे, अतिक अहमद अब्दुल हाफीज खान, सुधाकर राजाराम माने, अन्सार नजीर खाटीक आणि रवींद्र मेस्त्री चव्हाण, अशी फरार कैद्यांची नावे आहेत.

काही जण गैरफायदा घेतात
विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावर कैद्यांना ठिकठिकाणच्या कारागृहात पाठविले जाते. असे अनेक कैदी कळंबा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आणले जातात. नियमानुसार या कैद्यांना रजा दिली जाते, तसेच पॅरोलवर त्यांना सोडले जाते. रजा किंवा अभिवचनाची मुदत संपल्यानंतर त्यांनी स्वत:हून कारागृहात दाखल होणे आवश्‍यक असते. मात्र, काही कैदी हजर न होता फरार होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com