esakal | सांगलीत नव्याने 526 बाधित, 277 कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

526 newly infected in Sangli, 277 corona free

जिल्ह्यात आज नव्याने कोरोना बाधितांनी पाचशेचा टप्पा ओलांडला. आज 526 लोकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे 277 जण कोरोनामुक्तही झालेत. सहा जणांचा मृत्यू झाला.

सांगलीत नव्याने 526 बाधित, 277 कोरोनामुक्त
sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यात आज नव्याने कोरोना बाधितांनी पाचशेचा टप्पा ओलांडला. आज 526 लोकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे 277 जण कोरोनामुक्तही झालेत. सहा जणांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्हपैकी 619 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज वाळवा तालुक्‍यात 76 तर महापालिका हद्दीत 74 रुग्ण नव्याने बाधित आढळले. 

जिल्ह्यात सद्या 4 हजार 49 सक्रीय रुग्ण आहेत. आजअखेर 50 हजार 179 जण बरे झाले आहेत. आज अखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 1852 आहे. आजअखेर बाधित रुग्ण 56 हजार 80 आहेत. ग्रामीणमधील बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 691, शहरातील बाधितांची संख्या आठ हजार 501 तर महापालिका हद्दीत 18 हजार 888 रुग्ण आहेत. 

जिल्ह्यात आज सापडलेले तालुकानिहाय रुग्ण असे ः आटपाडी-28, जत-43, कडेगाव-51, खानापूर-57, पलूस-22, तासगाव- 60, महापालिका- 74, कवठेमहांकाळ- 31, मिरज-39, शिराळा-45, वाळवा-76. 

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून लसीकरणांसह खासगी रुग्णालये ताब्यात घेतली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. विशेष म्हणजे खासगी आणि शासकीय रुग्णालयात रेमडेसीव्हिर उपलब्धतेबाबत शासनाने घेतलेल्या धोरणांच्या तंतोतंत अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. 

तालुकानिहाय आजअखेरचे बाधित रुग्ण 
आटपाडी-3120 
जत- 2939 
कडेगाव- 3504 
कवठेमहांकाळ- 2735 
खानापूर- 3711 
मिरज- 5196 
पलूस- 2908 
शिराळा-2640 
तासगाव- 3880 
वाळवा-6559 
मनपा-18888 

एकूण 56 हजार 80 

संपादन : प्रफुल्ल सुतार