जिल्हा पोलिस दलात ५३ जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

सांगली - जिल्हा पोलिस दलात ५३ जागांच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २४ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. १७ मार्च रोजी रात्री १२ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत तसेच स्टेट बॅंकेत पैसे भरण्याची शेवटची तारीख २१ मार्च आहे.

महाराष्ट्र पोलिस शिपाई नियम २०११ व त्यामधील सुधारणा तसेच शासनाने यासंदर्भात निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या पदांपैकी शासनाने मंजुरी दिलेली ७५ टक्के पदेच भरली जाणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात शिपाई पदाच्या ५३ जागासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा पोलिस दलात ५३ जागा आरक्षणानुसार भरल्या जातील. आरक्षणानुसार सर्वसाधारण १५, महिला १७, खेळाडू ३, प्रकल्पग्रस्त ३, माजी सैनिक ८, अंशकालीन पदवीधर ३, पोलिस पाल्य १, गृहरक्षक दल ३ याप्रमाणे ५३ जागा भरल्या जातील. उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे.

माजी सैनिकांनी १५ वर्षे पूर्ण केल्यास दहावी उत्तीर्ण किंवा आयएएससी प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. १५ वर्षे सेवा पूर्ण नसल्यास १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. भरतीसाठी अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने १७ मार्च २०१७ रात्री १२ पर्यंत अर्ज भरावा. पोलिस शिपाईसाठी खुला प्रवर्गास ३५० रुपये मागास प्रवर्गासाठी २०० रुपये, माजी सैनिकांना खुला प्रवर्ग ५० रुपये, मागास प्रवर्गास ५० रुपये परीक्षा शुल्क आहे.

शुल्क २१ मार्चपर्यंत बॅंकेच्या वेळेत भरावेत. बॅंकेत चलन भरल्यानंतर अपडेटबाबत मेसेज येईल. अर्ज ऑनलाइन किंवा महा ई-सेवा केंद्राद्वारे भरता येतील.

भरतीसाठी प्रवेशपत्र देण्याची तारीख आणि भरतीची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. त्यात पात्र ठरणाऱ्यांची शंभर गुणांची चाचणी घेतली जाईल. शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून जे उत्तीर्ण होतील, त्यापैकी प्रवर्गनिहाय पदसंख्येच्या एकास १५ उमेदवार याप्रमाणे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील.

पोलिस भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाशी संपर्क साधून तक्रार करावी तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा भरती समिती अध्यक्षांशी किंवा अपर पोलिस अधीक्षक/पोलिस उपाधीक्षक (मुख्यालय) यांच्याशी संपर्क साधावा.
- दत्तात्रय शिंदे, पोलिस अधीक्षक

Web Title: 53 seats recruitment in district police