"त्या' उद्योजकाचे 55 लाख लांबविले 

मार्तंड बुचुडे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मुंबई येथील प्रथितयश उद्योजक तथा जामगावचे रहिवासी सुरेश धुरपते यांच्या कारमधून मंगळवारी रात्री 55 लाख रुपयांची चोरी झाली. याबाबत गुन्हा दाखल रण्यासाठी धुरपते यांच्यासह कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले होते. धुरपते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी सुरू होते. 

पारनेर  : मुंबई येथील प्रथितयश उद्योजक तथा जामगावचे रहिवासी सुरेश धुरपते यांच्या कारमधून मंगळवारी रात्री 55 लाख रुपयांची चोरी झाली. याबाबत गुन्हा दाखल रण्यासाठी धुरपते यांच्यासह कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले होते. धुरपते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी सुरू होते. 

अधिक माहिती अशी ः धुरपते काल रात्री उशिरा मुंबईहून जामगावमध्ये आले. घरी आल्यानंतर त्यांच्या चालकाने त्यांच्या कारमधील काही बॅगा घरात नेऊन ठेवल्या. मात्र, "एक बॅग कारमध्येच राहू दे,' असे धुरपते म्हणाले. त्यामुळे चालकाने कारच्या काचा बंद करून तो घरी निघून गेला. यानंतर काही वेळाने धुरपते बाहेर आले तेव्हा त्यांना कारची एका दरवाजाच्या बाजूची काच फोडल्याचे दिसून आले. 

कारमधील ती बॅग गायब 
कारमध्ये असलेले बॅगही गायब होती. धुरपते यांनी तत्काळ गावातील काही मित्रांना याची माहिती देऊन पोलिस ठाणे गाठले. आपल्या कारमधून 55 लाख चोरीला गेले असून, गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती. 
दरम्यान, या प्रकरणी पारनेर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समजली असून, त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. 

पोलिस चक्रावले? 
चोरीच्या घटनेबाबतच पोलिसांना संशय आहे. एवढी मोठी रक्कम असणारी बॅग कारमध्ये का ठेवली? अन्य बॅगा घरात नेल्या अन्‌ पैशाची बॅग मोटारीत का? अशा अनेक प्रश्‍नांमुळे पोलिस चक्रावून गेले, तसेच या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. 

दोन संशयित ताब्यात 
पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. 
- अजित पाटील, पोलिस उपअधीक्षक 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 55 lakh stolen from the entrepreneur