श्रीगोंद्यातून ५६ जण हद्दपार

श्रीगोंद्यातून ५६ जण हद्दपार

श्रीगोंदे (नगर) - श्रीगोंदे नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शहरातून ५६ जणांना हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांनी दिले. या दोन नगरसवेकांचा समावेश आहे. श्रीगोंदे पोलिसांनी १४२ जणांना शहरातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती मात्र दाणेज यांनी यातील केवळ ५६ जणांनाच हद्दपारीचे आदेश काढले.

नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहेत. श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी १४२ जणांना शहरातून हद्दपार करण्याची यादी सादर केली होती. मात्र प्रांताधिकारी दाणेज यांनी यातील ८६ जणांना क्लिनचिट देत त्यांची नावे हद्दपारीतून वगळले. हद्दपार केलेल्यांमध्ये सुनील वाळके व नाना कोथिंबीरे या दोन नगरसेवकांचा समावेश असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

शहरातून आजपासून २७ जानेवारीपर्यंत हद्दपार केलेल्या व्यक्ती पुढीलप्रमाणे - सुनील वाळके, ऋषिकेश गायकवाड, अविनाश घोडके, अतिक कुरेशी, स्वप्निल खेत्रे, अतुल दुतारे, बंडी उर्फ संतोष कोथिंबीरे, दीपक मखरे, जीवा घोडके, महेश कोथिंबीरे, बत्तीस शेख, नीतीन गायकवाड, युवराज सावंत, इम्रान सय्यद, गुलाब खेंडके, भीमा मखरे, दत्तात्रेय खेडकर, गणेश मोटे, गोरख लोखंडे, किरण उर्फ बाळू माने, अजीत माने, सुरेश जाधव, अरविंद माने, अनिल कोथिंबीरे, नाना कोथिंबीरे, बंडू कोथिंबीरे, गणेश कोथिंबीरे, शाम शेंडगे, अनिल शेंडगे, बाळू शेंडगे, राजेंद्र राऊत, वसीम ताडे, बापु दातीर, युसुफ शेख, अमीर शेख, दिलीप लबडे, दत्तु कोथिंबीरे, वैभव काळोखे, आदिशा उर्फ आदिक काळे, भाऊ कोथिंबीरे, विजय साळुंके, दिंगबर साळुंके, सचिन गायकवाड, संतोष मखरे, प्रदीप मोटे, अरिफ मालजप्ते, प्रविण मखरे, अक्षय मखरे, दत्तात्रेय वाळके, मंगेश वाळके, सागर मखरे, गणेश चांदगुडे, अक्षय काळे, मंगेश मोटे, गोरख आळेकर, नितीन वाळके.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com