जामखेड- गोविंद गायकवाड याच्यासह 6 जणांनी गोळ्या घातल्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

जामखेड : जामखेड येथील योगेश व राकेश राळेभात यांच्यावर गोविंद गायकवाड यांच्यासह सहा जणांनी गोळ्या घातल्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत कृष्णा अंबादास राळेभात(रा. मोरेवस्ती, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गोविंद दत्ता गायकवाड(रा. तेलंगशी) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. योगेश राळेभात व राकेश राळेभात जामखेड बाजार समितीच्या आवारातील काळेच्या हॉटेलवर सायंकाळी गप्पा मारत असताना गोविंद दत्ता गायकवाड यांच्यासह दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी गोळ्या घातल्या, असे राकेश राळेभात याने जमखी अवस्थेत असताना कृष्णा राळेभात यांना सांगितले.

एक वर्षापूर्वी योगेश व राकेश यांचे उल्हास माने यांच्या तलामीतील मुलांच्या बरोबर राजकीय बोर्ड लावण्यावरून वाद झाला होता. त्याच वादाच्या कारणावरून पिस्तूलातून गोळ्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

Web Title: 6 people including govind gaikwad killed 2 in jamkhed