अटी व शर्तींचा भंग केल्याने सहा ठिकाणचा वाळूउपसा बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

कऱ्हाड : माती मिश्रीत वाळु उपशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात अटी व शर्तीवर काही ठिकाणी परवानगी दिली होती. मात्र त्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचे तहसीलदार यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत दिसुन आले आहे. त्यासंदर्भातील अहवाल तहसील कार्यालयाकडुन प्रांताधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यावरुन तालुक्यातील शिवडे, उंब्रज, पेरले, कोर्टी आणि तासवडे येथील दोन असे एकुण सहा ठिकाणचा वाळु उपसा अटी व शर्तीचा भंग केल्याने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी आज दिली. 

मातीमिश्रीत वाळु उपसा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कऱ्हाड तालुक्यातुन वाहणाऱ्या कृष्णा व कोयना नदीपात्रात परवानगी दिली होती. ती करत असताना शासनाने घालुन दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे असेही संबंधितांना लेखी सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी तहसीलदार श्री. शेळके यांनी नायब सौ. मिनल भोसले, मंडल अधिकारी, तलाठी यांची पथके नेमली होती. त्या पथकांच्या तपासणीत 

शिवडे, उंब्रज, पेरले, कोर्टी आणि तासवडे येथील दोन अशा एकुण सहा ठिकाणी वाळु उपसा करताना अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन संबंधितांचे ठेके रद्द करावे, असा अहवाल तहसील कार्यालयाकडुन प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यावरुन अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी तालुक्यातील शिवडे, उंब्रज, पेरले, कोर्टी आणि तासवडे येथील दोन  असे सहा ठिकाणचा वाळु उपसा अटी व शर्तीचा भंग केल्याने बंद करण्याचे आदेश आज दिले. 

Web Title: on 6 places banned to take soil