सोलापुरात डेंगीचे 62 रुग्ण "पॅाझिटीव्ह"

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

सोलापूर शहरात गेल्या महिनाभरात डेंगीसदृश्य आजार झाल्याचे 200 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 62 जणांना डेंगीची लागण झाल्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे. दरम्यान, लारव्हा अळ्या आढळलेल्या भागात महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक आैषध फवारणी सुरु केली आहे. 

सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या महिनाभरात डेंगीसदृश्य आजार झाल्याचे 200 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 62 जणांना डेंगीची लागण झाल्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे. दरम्यान, लारव्हा अळ्या आढळलेल्या भागात महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक आैषध फवारणी सुरु केली आहे. 

बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणी बेसमेंटमध्ये पाणी साठविण्यात येते. स्लॅबसाठी पाण्याच्या पिशव्या लावण्यात येतात. सेंट्रींगच्या ठिकाणीही पाणी साचते. या ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या नोटीसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

बांधकामे सुरु असलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना 
त्याचा सर्वाधिक धोका असणार आहे. त्यामुले त्यांनी सावधगिरी बाळगावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. सोलापुरातील मुस्लीम पाच्छा पेठ, जुने विडी घरकूल, भवानी पेठ, कुमठा नाका, एकतानगर, होटगी रस्ता या परिसरात लारव्हा आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. या भागातच डेंगीच्या संशयित रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. या सर्व ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी धुरावणी फवारणी केली जात आहे. 

शहरातील डासोत्पत्तीची स्थाने
(स्त्रोत : हिवताप कार्यालय मनपा)
- विहिरी : 248
- सेफ्टिक टॅंक : 8270
- छोटे-मोठे नाले : 85
- खड्डे व गटारी : 23 हजार 613

आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू इडिस इजिप्‍ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसर्‍या निरोगी 
व्यक्तीस संक्रमित केले जातात.  हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि
 त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो 
आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. 
- डॅा. संतोष नवले, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 62 dengue patients in Solapur