राज्यातील ६३९ वीरपत्नींचा एसटी महामंडळाकडुन सन्मान  

हेमंत पवार 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - शहीद जवानांच्या वीरपत्नींना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधुन आजीवन मोफत प्रवास करता यावा यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सुरु केली. त्याअंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येपर्यंत राज्यातील ३० जिल्ह्यातील ६३९ वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. त्याव्दारे एसटी महामंडळाकडुन वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा लाभ देवुन सन्मान करण्यात आला आहे. 

शहीद जवानांच्या वीरपत्नींचा एसटी महामंडळाकडुन उचीत सन्मान व्हावा, त्यांना एसटीतुन प्रवास करताना एक रुपयाचीही झळ सोसायला लागु नये या हेतुने परिवहनमंत्री रावते यांनी शहीद जवानांच्या वीरपत्नींना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधुन आजीवन मोफत प्रवासाची योजना सुरु केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना या नावाने एसटीकडुन सध्या ती सुरु आहे. त्याव्दारे सैन्यदलामध्ये जे जवान शहीद होतात त्यांच्या वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्याची कारवाई सध्या सुरु आहे. 

राज्यपालांच्या हस्ते १ मे २०१८ रोजी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्याव्दारे स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येपर्यंत राज्यातील मुंबई - १२, रायगड(पेण) - १६, रत्नागिरी - ३०, सिंधुदुर्ग - ३०, ठाणे - १७, नाशिक - १६, धुळे - ९, जळगाव - ८, अहमदनगर - २९, पुणे - ७५, कोल्हापुर- ७८, सांगली - ७१, सोलापुर-३३, औरंगाबाद - १५, बीड-१५, जालना - १, लातुर-१५, नांदेड - ५, उस्मानाबाद -१०, परभणी - ६, नागपुर - ८, भंडारा - ६, चंद्रपुर - १, वर्धा - ३, अकोला - ९, गडचिरोली - १, अमरावती - ९, यवतमाळ - ८, बुलढाणा जिल्ह्यातील १३ अशा ३० जिल्ह्यातील ६३९ वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्याची कारवाई स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. 

सर्वात पुढे सातारा
सातारा ही शुर विरांची, वीज जवानांची भुमी आहे. जिल्ह्यातील अनेक तरुण दरवर्षी भारतीय सैन्यदलात भरती होत असतात. बलिदानाचीही पर्वा न करता शत्रुशी दोन हात करण्याची धमक जिल्ह्यातील जवानांमध्ये असते. त्यामुळेच कोणत्याही युध्दावेळी सातारा जिल्ह्यातील शहीद होणाऱ्यांची संख्याही देशात सर्वाधिक असते. एसटीने अशा वीरपत्नींना दिलेल्या मोफत एसटी पासमध्ये राज्यात सर्वात पुढे सातारा जिल्हाच आहे. जिल्ह्यातील ९० वीरपत्नींना ही सवलत देण्यात आली आहे

Web Title: 639 Veerapatni Honor by the ST Corporation in the State