मिरजेत हज यात्रेकरूंची ६४ लाखांची फसवणूक

मिरजेत हज यात्रेकरूंची ६४ लाखांची फसवणूक

मिरज - हज यात्रेकरूंची ६४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुलाम मुर्तजा अन्सारी (रा. मस्जीद बंदर, जे. एम. इंटरनॅशनल, मुंबई) याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २३ जानेवारी २०१७ पासून आजअखेर फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जुलेखा अब्दुल शेख (वय ४४, रा. निपाणीकर प्लायवूडमागे, कुपवाड रस्ता, मिरज) यांनी तक्रार दिली. त्यांचा आशियाना वर्ल्ड ट्रॅव्हल्स नावे टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. कंपनीच्या माध्यमातून ते मुस्लिम भाविकांना हज यात्रेला नेतात.

व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा संपर्क संशयित गुलाम अन्सारी याच्याशी आला. शेख यांच्या कंपनीला हज यात्रेचा परवाना काढून देण्याचे आमिष त्याने दाखवले. तसेच त्यांच्याकडे नोंद झालेल्या भाविकांना हज यात्रेला नेण्याचे आश्‍वासनही दिले. त्यासाठी १ कोटी २ लाख ३० हजार रुपये वेळोवेळी घेतले. 

पैसे घेऊनही परवाना न मिळाल्याने तसेच यात्रेकरूंना हजला न नेल्याने शेख यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. बऱ्याच पाठपुराव्यानंतर ३७ लाख ८१ हजार ५०० रुपये परत केले. उर्वरित ६४ लाख ४८ हजार ५०० रुपये दिले नाहीत. त्यामुळे शेख यांनी फसवणुकीची फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com