६६ गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

इचलकरंजी - जयसिंगपूर आणि इचलकरंजी पोलिस उपाधीक्षक कार्यालयाच्या हद्दीमध्ये तडीपार कारवाई सप्ताह घेण्यात आला. या सप्ताहमध्ये या दोन पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडून जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे ६६ गुन्हेगारांचे हद्दपारी विषयांचे प्रस्ताव पाठवल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. या तडीपार कारवाईला अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.

Web Title: 66 criminals Proposals for deportation