ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव : सांगलीत महामार्गाच्या पट्ट्यातील या गावांमध्ये २७ जणांना बाधा

7 people infected covid 19 health marathi news
7 people infected covid 19 health marathi news

नेर्ले (सांगली) :  वाळवा तालुक्यातील महामार्गाच्या पट्ट्यात रेठरे धरण,पेठ,कापूसखेड,आणि नेर्ले या गावांमध्ये कोरोना चे आतापर्यंत २७ रूग्ण आढळून आल्याने  प्रशासनाला ग्रामीण भागातला कोरोनाचा शिरकाव डोकेदुखी ठरणार आहे.

आज वाळवा तालुक्यतील कापूसखेडमध्ये  ६ रुग्ण तर काल रेठरे धरण येथे एकाच दिवशी ९ जणांचा कोरोनाची बाधा झाली.  तर पेठ येथे १ जनाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यापुर्वी नेर्ले गावातील ११ जणांचा अहवाल  पोजिटिव्ह आला आहे.

पेठ आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवापुरे,नेर्ले आरोग्य केंद्राचे डॉ सागर शिंदे मास्क व सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले आहे.अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रेठरे धरण येथे नऊ कोरोना पोजिटिव्ह पैकी ८महिलांचा समावेश आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com