राधानगरीचे दरवाजे पुन्हा उघडले; कोल्हापुरात नागरिकांमध्ये चिंता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाज्यातून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी सायंकाळी 5 वाजता 37 फूट 1 इंच होती. त्यामुळे जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर : मागील काही दिवसांपूर्वी कोल्हापुरला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाज्यातून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी 37 फूट 1 इंच होती. त्यामुळे जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीवरील-राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व शिरगाव हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड व आरे व बाचणी हे 3 बंधारे पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील कातळी, सांगशी, शेणवडे, कळे, मांडुकली व वतवडे हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी नदीवरील यवलुज, ठाणे-आवळे, पुनाळ- तिरपण, वालोली, बाजारभोगाव व करंजफेण हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत.

धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, दानोळी, मांगले सावर्डे, कोडोली, चावरे, तांदूळवाडी, शिरगाव व खोची हे 9 बंधारे पाण्याखाली आहे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवा  हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत.  वेदगंगा नदीवरील  गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेळोली, कुरणी, बस्तवडे व सुरुपली  हे 8 बंधारे पाण्याखाली आहेत.  

जिल्ह्यातील धरणांमधून होणारा विसर्ग पुढीलप्रमाणे

वारणा- 14851, तुळसी- 1521, कुंभी-1550, कासारी-950, दूधगंगा-13200 आणि कोयना-54380 क्युसेक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7112 cusecs of water from Radhanagari 66 dams under water