जिल्ह्यात उद्दीष्ट 718 सौर कृषी पंपाचे; बसवले 303 

718 solar agricultural pumps targeted in the district; Installed 303
718 solar agricultural pumps targeted in the district; Installed 303

सांगली : वीज पुरवठा नसतानाही दिवसा पीकांना गरजेवेळी पाणी देता यावे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणली. महावितरणमार्फत ही योजना राबवली जात आहे. सांगली जिल्ह्यात 718 सौर कृषी पंपाचे उद्दीष्ट असून 631 शेतकऱ्यांना अंदाजपत्रके दिली आहेत. सद्यस्थितीत 409 शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा रक्कम भरली आहे. पैकी 399 सौर पंप बसवण्याचे आदेश दिले असून 303 पंप बसवले आहेत. 

अनेक भागात शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध नसल्यामुळे पीकांना दिवसा पाणी देता येत नाही. बऱ्याचदा पाण्याअभावी पीके जळून जातात. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंमलात आणली. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न सुटून सिंचन वेळेत करता यावे हा योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागात वीज खंडीत झाल्यानंतर बरेच शेतकरी डिझेल पंप बसवतात. परंतू इंधनाचा खर्च अधिक आहे. त्यामुळे डिझेल पंपाऐवजी सौर पंप योजनेतून दिले जात आहेत. पाच एकरापर्यंत जमिनधारकास 3 अश्‍वशक्ती क्षमतेचा आणि त्यापुढील क्षेत्र धारण करणाऱ्यास 5 अश्‍वशक्ती क्षमतेचा सौरकृषी पंप दिला जातो. त्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याकडून 10 टक्के व अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांकडून पाच टक्के हिस्सा रक्कम भरणे आवश्‍यक आहे. 

शेतीला दिवसाच्या वेळी सिंचन करणे शक्‍य व्हावे या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महावितरणमार्फत राबवली जाते. सांगली जिल्ह्यात सध्या 3 अश्वशक्तीचे 267 तर 5 अश्वशक्तीचे 36 सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील 631 शेतकऱ्यांना सौर कृषीपंपासाठी अंदाजपत्रके दिली आहेत. त्यापैकी 409 शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा रक्कम भरणा केली आहे. शेतकऱ्यांनी निवडलेल्या पुरवठाधारक एजन्सीला सौरकृषी पंप बसवण्याचे कार्यादेश दिले आहेत. सध्या कार्यादेश दिलेल्या 399 पैकी 303 पंप बसवले आहेत. उर्वरीत कामे देखील सुरू आहेत. 

सौर कृषी पंप 
सांगली जिल्हा उद्दिष्ट - 718 
प्राप्त अर्ज- 1791 
नामंजूर अर्ज- 1149 

सौर कृषीपंपाचे फायदे 
* दिवसा शेतीपंपास अखंडीत वीज पुरवठा 
* वीज बिलापासून मुक्तता 
* डिझेल पंपाच्या तुलनेत शुन्य परिचलन खर्च 
* पर्यावरणपूरक 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com