सांगलीत 749 बाधित, 1019 कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

जिल्ह्यात आज 749 जणांना कोरोनाची बाधा झाली तर त्याचवेळी एका दिवसात 1019 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत पहिल्यांदाच कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दरम्यान, एका दिवसात 38 जणांचा बळी गेला आहे. एकूण बाधितांची संख्या 24 हजार 788 झाली आहे. 

सांगली ः जिल्ह्यात आज 749 जणांना कोरोनाची बाधा झाली तर त्याचवेळी एका दिवसात 1019 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत पहिल्यांदाच कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दरम्यान, एका दिवसात 38 जणांचा बळी गेला आहे. एकूण बाधितांची संख्या 24 हजार 788 झाली आहे. 

कोरोनामुक्त रुग्णांची गती वाढली तरच बेडची उपलब्धता आणि उपचार वेळेत मिळण्याला मदत होणार आहे. त्यादृष्टीने आजची आकडेवारी अधिक महत्वाची ठरते. आज 607 आरटीपीसीआर तपासण्या झाल्या. त्यात 248 बाधित आढळले. अँटीजेन तपासण्या 2009 झाला. त्यात 517 बाधित आढळले आहेत. .

आज आटपाडी तालुक्‍यात 38, जत 28, कडेगाव 36, कवठेमहांकाळ 46, खानापूर 43, मिरज 61, पलूस 48, शिराळा 37, तासगाव 31, वाळवा 169 तर मनपा क्षेत्रात 212 बाधित आढळले. कडेगाव तालुक्‍यातील 2, जत 1, खानापूर 4, मिरज 5, पलूस 6, तासगाव 2, शिराळा 5, वाळवा 2 तर मनपा क्षेत्रातील 10 रुग्णांचा मृत्यू झाला. परजिल्ह्यातील दोघांचा आज मृत्यू झाला. सध्या 813 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. नॉन इन्व्हेजीव व्हेंटीलेटरवर 112, हायफ्लो ऑक्‍सिजनवर 58 तर इन्व्हेजीव व्हेंटेलिटरवर 10 रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. या स्थितीत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 24 हजार 788 वर पोहचली आहे. 
 

* हजारचा टप्पा पार 
जत तालुक्‍याचा अपवाग वगळता जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्‍यांतील रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा आज पार केला. वाळवा तालुक्‍यात आणि मिरज तालुक्‍यात रुग्णसंख्या अडीच हजारावर पोहचली आहे. 
----------- 

आजचे बाधित ः 749 
उपचाराखाली ः 9033 
बरे झालेले ः 14,824 
एकूण मृत्यू ः 931 
एकूण बाधित ः 24,788 
चिंताजनक ः 993 
ग्रामीण बाधित ः 10658 
शहरी बाधित 3294 
मनपा क्षेत्र ः 10836 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 749 disrupted in Sangli, 1019 corona free