सातारा : उत्तर भारतात पर्यटनास निघालेल्या ट्रॅव्हल्सला वाठार स्टेशन येथे अपघात झाल्याने आठ जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 40 पर्यटक उत्तर भारतात पर्यटनास निघाले होते. शनिवारी रात्री 11 वाजता ही बस कोल्हापूर येवून पर्यटकास घेत निघाली होती. आज सकाळी पाच वाजता कोरेगाव येथील दोन पर्यटक घेऊन ही बस मोरगावकडे निघाली होती. सकाळी सहा वाजता वाठार स्टेशन येथील हॉटेल साई ढाबा येथे समोरून येणाऱ्या माल वाहतूक ट्रक व या बसमध्ये जोरदार धडक झाली.
या अपघातात ट्रक चालक, बसमधील दोन चालकांसह पाच पर्यटक जखमी झाले असून चार जण गंभीर आहेत. वाठार पोलिस व स्थानिक लोकांनी जखमींना बसमधून बाहेर काढून उपचाराकरिता सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले दरम्यान अपघातामुळे या मार्गावर तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.