जिल्ह्यातील 80 टक्के बार, परमिट रूम हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

सांगली/ मिरज - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना आकर्षित मद्यविक्रीचे विद्युत रोषणाईतील फलक आणि बार, परमिट रूम 31 मार्चनंतर हद्दपार होतील. या मार्गावर 500 मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर परिसरात दारू विक्री करता येणार नाही. रस्त्यापासून थेट हवेतून बार, परमिट रूमपर्यंत माप टाकून अंतर मोजले जात आहे. त्यामुळे कोणतीही पळवाट शोधता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल. या आदेशामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील 80 टक्के बार, परमिट रूम अन्यत्र स्थलांतर होतील. या निर्णयाचे महिलांसह अनेकांनी स्वागत केले आहे. 

सांगली/ मिरज - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना आकर्षित मद्यविक्रीचे विद्युत रोषणाईतील फलक आणि बार, परमिट रूम 31 मार्चनंतर हद्दपार होतील. या मार्गावर 500 मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर परिसरात दारू विक्री करता येणार नाही. रस्त्यापासून थेट हवेतून बार, परमिट रूमपर्यंत माप टाकून अंतर मोजले जात आहे. त्यामुळे कोणतीही पळवाट शोधता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल. या आदेशामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील 80 टक्के बार, परमिट रूम अन्यत्र स्थलांतर होतील. या निर्णयाचे महिलांसह अनेकांनी स्वागत केले आहे. 

दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत देशातील सर्वच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचे आदेश दिले. राज्य सरकारने 16 डिसेबरला राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत आदेश दिले आहेत. त्यासाठी 31 मार्चची "डेडलाइन' दिली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी व कर्मचारी यांनी पहिल्या टप्प्यात सर्वच वाइन शॉप, परमिट रूम, देशी दारू विक्रेते, बीअर शॉपी यांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मोजमाप घेतले जात आहे. दारू विक्रेत्यांना धारेवर धरले जात आहे. विक्रेत्यांनी पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच परवाना नूतनीकरण करून घेतला जाईल. 

तीन महिन्यांत मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरावर सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून बार, परमिट रूम किंवा वाइन शॉप उभारणे अवघड आहे. त्यामुळे बरेच मालक परवाना परत करण्यासाठी हालचाली करत आहेत. काही मालकांनी जुजबी व्यवस्था केली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण भागातील देशी दारू विक्रेते आता निर्जन ठिकाणी जागा खरेदी करून दुकान हलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही जुन्या वाइन शॉप परवानाधारकांनी तर ही कटकटच नको म्हणून परवाने विक्रीस काढले आहेत. त्यामुळे बड्या असामी हे परवाने कमी किमतीत खरेदीसाठी प्रयत्नशील आहेत. 

जिल्ह्यातील चित्र 

होलसेल विदेशी दारू विक्रेते- 03 
वाइन शॉप- 25 
परमिट रूम- 470 
देशी दारू दुकाने- 208 
बीअर शॉपी- 82 

जिल्ह्यात येथे अंमलबजावणी- 
सांगली ते मिरज, मिरज-पंढरपूर, सांगली ते कोल्हापूर, मिरज ते अंकली, मिरज ते म्हैसाळ, सांगली ते विटा, विटा ते कऱ्हाड, विटा ते जत, सांगली ते इस्लामपूर-पेठनाका, राष्ट्रीय महामार्ग, सांगली ते पलूस-ताकारी, विटा-कुंडल रस्ता यासह जिल्ह्यातील सर्व राज्य मार्गावरील बार, परमिटरूम, बीअर शॉपी, देशी-विदेशी दुकाने यांना फटका बसणार आहे. 

हवाई अंतर मोजणार- 
राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून दारूचे दुकान 500 मीटर अंतरावर येते काय नाही? याची मोजणी तेथे जाणाऱ्या रस्त्यावर मोजली जाणार नाही. तर महामार्गावर उभे राहून थेट हवेतून दुकानापर्यंत माप टाकले जाईल. ते 500 मीटरपर्यंत असल्यास दारू दुकान किंवा बार अन्यत्र स्थलांतर केला जाणार आहे. 

आदेशाचे स्वागत- 

वास्तविक हा निर्णय शासनानेच हा घेणे आवश्‍यक होते. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहणे गरजेचे नव्हते. किमान या आदेशातुन तरी शासनाने काही तरी शहाणपणा घ्यावे. समाज आणि कुटूंबव्यवस्था उध्वस्त करणारी दारु दुकाने कायमची बंद करण्याबाबतच आता शासनाने ठोस कारवाई करावी. आणखी बळी जाण्याची वाट पाहू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागतच आहे. 
-अश्‍विनीताई कुलकर्णी (तनिष्का सदस्या,मिरज) 

गावातूनही हद्दपार करा- 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हा महिलांना अर्धा आनंद झाला आहे. गावातुन दारु हद्दपार करण्यासाठी केलेला संघर्ष पाहता हा निर्णय महिलांना आनंददायीच आहे. यापुढे गावागावातुन दारूची विक्री बंद करण्यासाठी अशाच कायदेशीर मुद्यांचा आधार घ्यावा. त्यासाठी महिलांनी एकत्रित यावे. 

-चंपाताई जाधव (सोनी ता. मिरज) 

Web Title: 80 per cent of the district bar, permit room exile