अक्कलकोट तालुक्यात ८२ टक्के ब्लेझर परिधान शिक्षक

akkalkoth
akkalkoth

अक्कलकोट : शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने व सकारात्मक रीतीने गणवेश व ब्लेझर स्विकारला असून, त्यामुळे ते स्मार्ट होत आहेत. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला असून, पालकांचाही जि.प. शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास याची निश्चित मदत होईल असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले. मंगळवारीअक्कलकोट येथे पं. स. सभागृहात घेतलेल्या खातेप्रमुखांच्या विविध योजना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. 

द्वितीय सत्राच्या पहिल्याच दिवशी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे ८२ टक्के प्राथमिक शिक्षक ब्लेझरसह गणवेशात उपस्थित होते. त्याबद्दल जि.प. सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी गट शिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे व शिक्षण विभागाचे अभिनंदन केले. तालुक्यात एकूण २५७ जिल्हा परिषद शाळा असून, त्यांची एकूण १० पथके व १४२ कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती. गटविकास अधिकारी महादेव कोळी व सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव बेळळे व गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे यांनी तपासणीसाठी उत्कृष्ट नियोजन केले होते. तालुक्यात १०८९ शिक्षक शाळेस हजर होते. हे सर्व शिक्षक गणवेशात व त्यापैकी ९०० शिक्षक हे ब्लेझरसह गणवेशात हजर असल्याचे आढळले. त्यात हन्नुर व कडबगांव केंद्रात शंभर टक्के शिक्षक ब्लेझर परिधान करून आले होते. शिक्षकांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमास एवढ्या मोठ्या संख्येने मिळालेला प्रतिसाद पाहून डॉ. भारुड यांनी गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे, विस्तार अधिकारी रतीलाल भुसे व सुहास गुरव तसेच सर्व केंद्रप्रमुख व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. अक्कलकोट शिक्षण विभाग चांगल्या प्रकारे काम करत असल्याबद्दल डॉ. भारुड यांनी समाधान व्यक्त केले. 

याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, गटविकास अधिकारी महादेव कोळी व सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव बेळळे व सर्व विभागांचे खातेप्रमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com