जिल्ह्यात डेंगीचे 82 रुग्ण

जिल्ह्यात डेंगीचे 82 रुग्ण

सोलापूर  ः जानेवारी ते आजअखेर जिल्ह्यात डेंगीसदृष्य तापाचे एकूण 82 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात 45, शहरी भागात पाच, महापालिका भागात 32 रुग्ण आहेत. डेंगी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी आज झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत दिल्या.

श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सदस्य अरुण तोडकर, नीलकंठ देशमुख, अतुल खरात, अण्णाराव बाराचारे, स्वाती कांबळे, रुक्‍मिणी ढोणे, शीलावती भासगी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, डेंगीच्या उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धूर फवारणी करण्यावर भर द्यावा. पाणी साठ्याची तपासणी करावी. लोकांमध्ये डेंगीबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पाच हजार 400 बालके व तेवढ्याच गरोदर मातांना दरमहा लसीकरण केले जाते. त्यांच्या आरोग्याची तपासणीही केली जाते. आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांमार्फत ही सेवा दिली जाते. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत जिल्ह्यात मिशन इंद्रधनू ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा कुष्ठरोग अधिकारी हे सभेसाठी वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव उपसंचालकांकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कोल्हापूर शहरात पुन्हा येणार महिलाराज

प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा ठराव
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत. असे असतानाही आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी आयुक्तांच्या आदेशाशिवाय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. असा सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com