इंग्रजी शाळांना 827 विद्यार्थ्यांचा बाय बाय! 

इंग्रजी शाळांना 827 विद्यार्थ्यांचा बाय बाय! 

सातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात असल्याने निष्पन्न झाले आहेत. गेल्या वर्षी 905 विद्यार्थ्यांनी खासगी माध्यमांच्या शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक वर्षातही 827 मुलांनी इंग्रजी शाळांना बाय बाय करून जिल्हा परिषदेच्या शाळांची कास धरली आहे. 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत घेतलेल्या संकलित मूल्यमापनाच्या चाचण्यांमध्ये सातारा जिल्ह्याने ठसा उमठविला होता. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातही सातारा जिल्ह्यातील शाळांचा समावेश राहिला आहे. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा प्रबोधिनी, शाळा सिद्धी उपक्रमातही प्राथमिक शाळांनी प्रभावी कामगिरी केली आहे. "आयएसओ', डिजिटल होण्यातही प्राथमिक शाळा अग्रेसर आहेत. अनेक शाळांनी, तर गुणवत्तेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांपुढेच आव्हान दिले आहे. लोकसहभागातून निधी एकत्रित करून त्याद्वारे शाळांची भौतिक स्थितीही सुधारली आहे. 

बहुतांश शाळांमध्ये सेमी इंग्रजी, रात्र अभ्यासिका यासारखे प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचा परिपाक म्हणून आता इंग्रजी, खासगी माध्यमांच्या शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गुणवत्तेच्या बाबतीत वरचढ ठरत आहेत. कऱ्हाडमध्ये सर्वाधिक 144, खटावमध्ये 142, तर सातारा तालुक्‍यातील 103 विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांचा रस्ता सोडून जिल्हा परिषद शाळांत प्रवेश घेतला आहे. मात्र, महाबळेश्‍वर, पाचगणीमध्ये अद्यापही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वरचेष्मा राहिला आहे. तेथील केवळ सहा विद्यार्थ्यांनी खासगी शाळांतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. 

अशा आहेत शाळा 

जिल्हा परिषदेच्या तालुकानिहाय शाळा : जावळी 204, कऱ्हाड 306, खंडाळा 118, खटाव 247, कोरेगाव 184, महाबळेश्‍वर 119, माण 269, पाटण 530, फलटण 303, सातारा 256, वाई 167. एकूण शाळा 2703. (माहिती स्तोत्र : प्राथमिक शिक्षण विभाग) 

असा घडतोय बदल... 

- 2006 डिजिटल शाळा 
- 594 आयएसओ शाळा 
नावीन्यपूर्ण उपक्रमावर भर 
- गुणवत्तापूर्ण शिक्षणात वाढ 
- स्पर्धा परीक्षांमध्ये दर्जेदार 
- भौतिक सुविधांचे आकर्षण 

इंग्रजी माध्यमातून "झेडपी'कडे! 

तालुका............विद्यार्थी संख्या 
कऱ्हाड............. 144 
खटाव.............. 142 
सातारा............. 103 
फलटण............. 97 
कोरेगाव............ 89 
वाई................. 67 
खंडाळा............ 67 
जावळी............. 47 
पाटण.............. 42 
माण................23 
महाबळेश्‍वर........ 6 

एकूण............... 827 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com