सांगलीत निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर गाडीत सापडले साडेआठ लाख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सांगली : महापालिकेची निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असताना काल सायंकाळी येथे एका वाहनातून संशयास्पदरित्या नेली जाणारी साडेआठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सांगली ते माधवनगर रस्त्यावरील जुन्या जकात नाक्‍यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय 55, रा. वाळवा) यांना ताब्यात घेतले आहे. 

महापालिकेची निवडणूक 1 ऑगस्ट रोजी होत आहे. त्यामुळे सर्व जुन्या जकात नाक्‍यांवर तपासणी सुरु करण्यात आले आहे. हे नाके पोलिसांचे चेकपोस्ट झाले आहेत. अवैध धंदे रोखण्यांसाठी सर्व चारचाकी वाहनांची तापसणी करण्यात येत आहे. तपासणी पथकास काल सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास एमएच 10 ए 5151 या वाहनाच्या तपासणीत आठ लाख 51 हजारांची रोकड मिळून आली. सुरेश कोठावळे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी ही रक्कम बेकायदा असल्याची प्राथमिक माहिती हाती आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 
कोळावळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चारचाकी वाहन आणि रक्कम जप्त केली आहे. कारवाईत पथकाचे प्रमुख एस. पी. इंगवले, एन. एस. सुतार, एम. एम. कांबळे, हसन मुलाणी यांचा सहभाग होता. सदर रक्कमेबाबत पुढील कारवाईसाठी आयकर विभागास कळविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे यांनी सांगितले. 

भरारी पथकांसह तपासणी नाके 
महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध धंदे मुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या आदेशानुसार आठ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर हे नाके उभारण्यात आले आहे. चोवीस तास पथकांची नजर राहणार आहे. तसचे शहरातील अवैध धंदे रोखण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूकीवर पोलिसांसह पालिका प्रशासनाचा वॉच राहणार आहे. 

Web Title: 8.5 lakhs found in car in background of sangali elections