Sangali : एसटीच्या ९६ फेऱ्या झाल्या सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st buses
एसटी फेर्‍या सुरु

एसटीच्या ९६ फेऱ्या झाल्या सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील एस.टी. ची सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. आज दहा आगारात ९६ गाड्या धावल्या. दुसरीकडे संप सुरुच असून आज संपात सहभागी १८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. तर आठ जणांचे निलंबन केले. तर कारवाईच्या दणक्याने २० कर्मचारी कामावर हजर झाले.

एस. टी. चे शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी ९ नोव्हेंबरपासून संप सुरु आहे. दुसरीकडे संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीची वाहतूक पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील दहा आगारातील ९६ फेर्‍या सुरु करण्यात आल्या. दरम्यान, आज रोजंदारीवरील१८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. कारवाईच्या या दणक्याने २० कर्मचारी कामावर हजर झाले होते.

loading image
go to top