वय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल! (व्हिडिओ)

संपत मोरे
बुधवार, 16 जानेवारी 2019

"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज कुंडलला निघालो आहे. "असे सांगणारे हे 98 वर्षाचे सायकलस्वार गणपती बाळा यादव आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रामापूर गावचे.

सांगली : "माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज कुंडलला निघालो आहे. "असे सांगणारे हे 98 वर्षाचे सायकलस्वार गणपती बाळा यादव आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रामापूर गावचे.

यादव सांगतात, "मला पहिल्यादा जेव्हा सायकल मिळाली तेव्हापासून आजतागायत मी सायकलीवरून प्रवास करतो. मला सायकलची खूप आवड आहे. माझ्या गावापासून अगदी पंढरपुरला मी दर महिन्याला सायकलवरून जात होतो. आता माझी मुलं एवढ्या दूर जाऊन देत नाहीत. पण आसपासच्या गावाला मी सायकलवरून जातो. मला रोज किमान वीस किलोमीटर प्रवास केल्याशिवाय जमत नाही."

"मी वयाच्या विसाव्या वर्षी सायकल चालवायला लागलो. आमच्या सांगली जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढा उभारला होता त्या लढ्यात मी सहभागी झालो होतो. तेव्हा मी सायकलवरून भूमिगत कार्यकर्त्यांना जेवण घेऊन जात होतो. स्वातंत्र्य चळवळीत सायकलीचा मला खूप उपयोग झाला. क्रांतिसिंह नाना पाटील हे माझं नेहमी कौतुक करत होते." "मी एवढी वर्ष का जगलो याच उत्तर म्हणजे मी सायकल चालवतो. आजच्या तरुणांनी सायकल चालवली पाहिजे." असे ते म्हणतात.

Web Title: 98 years old man rides a cycle