सांगली-सातारा विधान परिषदेसाठी चुरशीने 99 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज दोन्ही जिल्ह्यात अत्यंत चुरशीने मतदान झाले. एकूण 570 मतदारांपैकी 569 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 99.82 टक्के मतदान झाले. कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांच्या लढतीत कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांच्या आव्हानामुळे रंगत निर्माण झाली. दोन्ही जिल्ह्यात एकूण आठ मतदान केंद्रांवर मतदान झाले. मंगळवारी सांगलीत मतमोजणी होणार आहे.

आज सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यात एकूण चार मतदान केंद्रांवर 266 मतदान होते. सर्वाधिक 151 मतदान जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनमध्ये असलेल्या केंद्रावर होते. याठिकाणी महापालिकेच्या एका नगसेवकाचे मतदान वगळता जिल्ह्यात एकूण 265 मतदान झाले.

सातारा जिल्ह्यातही चार मतदान केंद्रांवर एकूण 304 मतदान होते. यातील सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सर्वाधिक 140 मतदान होते. या सर्व ठिकाणी चुरशीने शंभर टक्के मतदान झाले.

Web Title: 99% voting vidhan parishad in sangli-satara